जयपूर : मुंबई इंडियन्सच्या संघाला मोक्याच्या सामन्यात पराभव पत्कराव लागला. पंजाब किंग्सने मुंबईच्या गोलंदाजीवर कडक प्रहार करत हा सामान सहजपणे जिंकला. मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद १८४ धावा केल्या. मुंबईकडून सर्वाधिक धावा सूर्यकुमार यादवने केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबने जोरदार टक्कर दिली.पंजाबकडून प्रियांश आर्या आणि जोश इंग्लिस यांनी दमदार फलंदाजी केली. आता मुंबईला एलिमिनेटरचा सामना खेळावा लागेल. पंजाबने ७ विकेटने मुंबईला पराभूत केले. पंजाबने १८.३ ओव्हरमध्ये ३ बाद १८७ धावा केल्या. जोशने यावेळी ७३ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळे पंजाबला सात विकेट्स राखून हा सामना जिंकता आला. मुंबई इंडियन्सचा विजयरथ यावेळी पंजाबच्या संघाने रोखला.
Fans
Followers